तोंडवळी येथील मजूर बेपत्ता…

मालवण ता.०२-:
मालवण तालुक्यातील तोंडवळी येथील बागेत काम करणारा मजूर मुन्नाकुमार प्रसादमहिराज बीन (वय २३, रा. दुधघाट जिल्हा भोजपुर राज्य बिहार) हा गेले सहा दिवसांपासून बेपत्ता आहे. याबाबत मालवण पोलीस ठाण्यात त्याचा भाऊ विजय बीन याने खबर दिली आहे.

मुन्नाकुमार बीन हा युवक तोंडवळी येथील संतोष पाटील यांच्या मालकीच्या आंबा कलम बागेत कामाला होता. २६ मार्च रोजी आपण बंगलोरला जातो असे सांगून कणकवली रेल्वेस्टेशनवर दुपारी १ वाजता पोहोचला. मात्र, तो अद्यापही परत न आल्याने त्याचा भाऊ विजय याने तो बेपत्ता असल्याची खबर पोलीस ठाण्यात दिली आहे.

You cannot copy content of this page