रेल्वेच्या तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या युवकास जामीन…

⚡कणकवली ता.०२-: रेल्वेच्या तिकिटाचा काळाबाजार करणाऱ्या शहरातील एका दुकानात कामास असलेल्या मुकुंद शिवाजी सातवसे (३०, राहणार बांधकरवाडी कणकवली)याला रेल्वे पोलिसांनी सोमवारी ताब्यात घेतले होते. मुकुंद सातवसे याला मंगळवारी न्यायालयात हजर केले असता जामीन देण्यात आला आहे.

शहरातील एका दुकानात काम करत असणारा मुकुंद सातवसे हा रेल्वेच्या तिकिटांचा काळाबाजार करीत असल्याची गुप्त माहिती रेल्वे पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार रेल्वे पोलिसांनी सोमवारी दुपारी १ वाजता शहरातून त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला पोलिसांनी कणकवली रेल्वे स्थानकातील आरसीएफच्या कार्यालयात चौकशीसाठी नेले होते. त्याच्याकडून रेल्वेच्या तिकिटाचे काळाबाजार करण्यासाठी वापरण्यात येणारी यंत्रेही पोलिसांनी जप्त केली होती.

You cannot copy content of this page