Headlines

एससी/एसटी समुदायासाठी समुद्री शेवाळ विषयी व्यवहारिक प्रशिक्षणाचे आयोजन…

⚡मालवण ता.०२-: जलजीविका संस्था व नीलक्रांती कृषी व मत्स्य पर्यटन संस्था मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने SC/ST समुदायासाठी एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात मोफत दोन दिवसीय समुद्र शेवाळ या विषयावर व्यावहारिक प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार आहे.

या प्रशिक्षणा मध्ये समुद्री शेवाळचे आर्थिक फायदे, बांबू आणि तराफा राफ्ट बांधणी, समुद्री शेवाळ काढण्याचा पद्धती, समुद्री शेवाळ वाळवणे आणि त्यावर प्रक्रिया करायच्या पद्धती, समुद्री शेवाळ संबंधी आर्थिक साक्षरता आणि डिजिटल साक्षरता, समुद्री शेवाळ संबंधी सरकारी योजना आदी विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या प्रशिक्षणामुळे ASCI (Agriculture Skill Council of India) द्वारे मिळणारे प्रमाणपत्र सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. दोन दिवसांचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर सहभागीला ५०० रुपये मिळतील, जर उमेदवाराला समुद्री शेवाळ लागवडीत रस असेल, तर त्यांना जलजीविकाकडून आणि निलक्रांती कडून तांत्रिक मदत मिळणार आहे.

या प्रशिक्षणासाठी सहभागी उमेदवार वैध जात प्रमाणपत्रासह SC/ST समुदायाचा व २० ते ४० वयोगटातील असावा, उमेदवाराचे शिक्षण किमान दहावीपर्यंत असावे, या प्रशिक्षणासाठी Stipend मिळविण्यासाठी उमेदवाराचे बँक खाते असणे आवश्यक आहे. इच्छुकांनी प्रशिक्षणासाठी
https://forms.gle/rpmKMptwqWgEnysDA हा ऑनलाइन फॉर्म भरावा. अधिक माहितीसाठी नीलक्रांती संस्था: 8805833518 येथे संपर्क साधावा असे आवाहन रविकिरण तोरसकर यांनी केले आहे.

You cannot copy content of this page
10:06