बांदा येथे संयुक्त योगोपचार शिबीराचे उदघाटन…

⚡बांदा ता.०२:- पतंजली योग समिती सिंधुदुर्ग मार्फत कै माधव हरी अळवणी सभागृह मोर्येवाडी बांदा येथे आज दि 2 एप्रिल 2024 रोजी सकाळी संयुक्त योगोपचार शिबिराचे उदघाटन करण्यात आले . या शिबिराला उद्घाटक म्हणून पतंजली योगसमिती सिंधुदुर्ग जिल्हाप्रभारी श्री शेखर बांदेकर लाभले.

त्यावेळी सोशल मीडिया तहसील प्रभारी श्री लक्ष्मण पावसकर, किसान सेवा समिती सावंतवाडी तहसिल प्रभारी श्री संतोष मोरे, श्री संजय नाईक, श्री आपा चिंदरकर, श्री भीमराव सावंत , सौ स्वेता कोरगावकर, सौ राजश्री तेंडले आदी मान्यवर उपस्थित होते.
दिप प्रज्वलनाने शिबिराचे उद्घाटन झाल्यानंतर जिल्हाप्रभारी श्री शेखरजी बांदेकर यांनी योगाभ्यास घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री लक्ष्मण पावसकर , तर आभार प्रदर्शन श्री संजय नाईक यांनी केले . सदर शिबिरास योगाभ्यास प्रेमींनी , तसेच गावातील नागरिकांनी देखील सहभाग घेतला.
बांदा ग्रुप विविध कार्यकारी सेवा सहकारी मंडळ लि बांदा संस्थेच्या व्यवस्थापकांनी सदर शिबिरासाठी लागणारे सभागृह, स्टेज, साउंड सिस्टीम आणि जागा मोफत उपलब्ध करून दिली. निरोगी आरोग्यासाठी योगाभ्यास करणे या सारखे दुसरे औषध नाही असे उदघाटक बांदेकर यांनी सांगितले.

You cannot copy content of this page