⚡मालवण ता.०१-: भारतीय स्वातंत्र्याच्या प्राप्तीसाठी सशस्त्र क्रांतीचा पुरस्कार करणारे थोर देशभक्त, साहित्यिक आणि समाजसुधारक विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनावर आधारित ‘स्वातंत्रवीर सावरकर’ हा चित्रपट सिने कलाकार रणदीप हुड्डा यांनी प्रकाशित केला आहे. मालवण मधील सामाजिक कार्यकर्ते सौरभ श्रीकृष्ण ताम्हणकर यांच्या विद्यमाने “स्वातंत्र्यवीर सावरकर” चित्रपटाचा मोफत शो शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरिता शुक्रवार दि. ५ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता देवबाग येथील समर्थ चित्रपटगृहात दाखविण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांसोबत एका पालकाला मोफत पास देण्यात येणार आहे.
तरी मालवण शहरातील सर्व शाळा, महाविद्यालय मधील शिक्षकांनी आपल्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना याचा लाभ द्यावा, अधिक माहिती साठी सौरभ ताम्हणकर 7588564887 व 9209333012 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन सौरभ ताम्हणकर यांच्या वतीने करण्यात आले आहे.
