रेल्वेच्या तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या युवकास रेल्वे पोलिसांनी पकडले…

⚡कणकवली ता.०१-: रेल्वेच्या तिकिटाचा काळाबाजार करणाऱ्या शहरातील एका दुकानात कामास असलेल्या संशयित युवकास रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतले. ही कारवाई सोमवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. या कारवाईमुळे रेल्वे तिकिटाचा काळाबाजार करणाऱ्याचे धाबे दणाणले आहेत.


शहरातील एका दुकानात काम करत असणारा व्यक्ती रेल्वेच्या तिकिटांचा काळाबाजार करीत असल्याची गुप्त माहिती रेल्वे पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार रेल्वे पोलिसांनी सोमवारी दुपारी शहरातून एका संशियत युवकास ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला पोलिसांनी कणकवली रेल्वे स्थानकातील आरसीएफच्या कार्यालयात चौकशीसाठी नेले. त्याठिकाणी त्याची चौकशी सुरु होती. सदर युवकाकडून रेल्वेच्या तिकिटाचे काळाबाजार करण्यासाठी वापरण्यात येणारी यंत्रेही पोलिसांनी जप्त केली. याप्रकरणी सदर युवकाची पोलिसांकडून चौकशी सुरु असून चौकशीअंती त्याला
न्यायालयात हजर केले जाणार आहे. अशी माहिती रेल्वे पोलिसांनी दिली.

You cannot copy content of this page