हजारांचे नुकसान:नगरपंचायत अग्निशमन दलाच्या मदतीने आग आली आटोक्यात..
⚡कणकवली ता.०१-: कणकवली पटवर्धन चौकात असणाऱ्या लक्ष्मी दत्त कॉम्प्लेक्स मध्ये असलेल्या जय श्री मोबाईल या होलसेलर मोबाईलच्या स्पेअर पार्ट व मोबाईल शॉपी च्या दुकानाला लागलेल्या आगीत पूर्णता दुकान जळून खाक झाले. सोमवारी सकाळी ७ वाजता आग लागल्याचे निदर्शनास आल्यानंतर नगरपंचायत चा बंब बोलव आग आटोक्यात आणण्यात आली.
लक्ष्मी दत्त कॉम्प्लेक्स मधील सकाळी लवकर दुकान उघडणाऱ्या दुकानदारांना मोबाईलच्या दुकानामधून दूर येताना दिसला. दुकानातून धूर येऊ लागल्यानंतर काहींनी आसपासच्या गाळेधारकांना फोन केले. राजस्थान येथील व्यापारी असलेल्या या दुकान मालकाला देखील फोन करण्यात आले. मात्र तो येईपर्यंत काही वेळातच अक्षरशा दुकानाची राख रांगोळी झाली. त्यात दुकान मालकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. दरम्यान आगीची माहिती मिळताच कणकवली नगरपंचायत चा अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाला. मात्र तो पर्यत दुकानाच्या आतील भाग पूर्णतः आगीने वेढून गेला होता. त्यानंतर मोबाईल दुकानाचे शटर तोडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. घटनेची माहिती मिळतात कणकवली माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, सामाजिक कार्यकर्ते संजय मालडकर, संदीप नलावडे, प्रसाद अंधारी, संतोष पुजारे, दत्ता शंकरदास, अण्णा कोदे यांच्यासह अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली व मदत कार्यात सहभाग घेतला. नगरपंचायत कर्मचाऱ्यांनी अथक प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवले.
