मविआचे उमेदवार विनायक राऊत यांच्या खळा बैठक प्रचाराला सुरूवात…

⚡कुडाळ ता.३०-: रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात ३ मे रोजी कणकवलीत उद्धव ठाकरे आणि ४ मे रोजी आदित्य ठाकरे यांची जाहीर सभा होणार असून महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांनी दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराला सुरुवात केली आहे.

गावागावात खळा बैठका घेत प्रचाराला सुरूवात केली असून दररोज दहा गावात खळा बैठका घेऊन प्रचार केला जाणार असल्याचे विनायक राऊत यांनी सांगितलं आहे.
तर १६ एप्रिल रोजी विनायक राऊत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यानंतर जाहीर सभा या मतदारसंघात घेतील.

You cannot copy content of this page