शासनाने संच मान्यतेचा नवीन आदेश बदलावा…

शिक्षक संघांची निवेदनाद्वारे शिक्षण सचिवांकडे मागणी.

ओरोस ता.२२-:राज्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या वतीने प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील शिक्षकांची संचमान्यता करताना सुधारीत निकष नुकतेच जाहीर करण्यात आले आहेत. यामुळे राज्यातील हजारो शिक्षक अतिरिक्त होणार असून विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता पुर्ण शिक्षणावर गंभीर परिणाम होण्याची भिती व्यक्त करण्यात आली.

या पार्श्वभूमीवर हा शासन निर्णय रद्द करण्यात यावा बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षण अधिकार अधिनियम २००९ तील मुळ तरतुदी प्रमाणे संचमान्यता करण्यात यावी, अशी मागणी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष देविदास बस्वदे, सरचिटणीस कल्याण लवांडे यांनी राज्याचे शिक्षण सचिव यांना निवेदनाद्वारे केली आहे, अशी माहिती संघटनेचे नेते म ल देसाई यांनी दिली.

You cannot copy content of this page