अवैधरित्या दारू वाहतूक प्रकरणी सावंतवाडीतील एक ताब्यात…

राज्य उत्पादन शुल्क पथकाची कारवाई; चार लाखाचा मुद्देमाल जप्त..

⚡बांदा ता.११-: जुना पत्रादेवी बांदा पोस्ट ऑफिस जवळ अवैधरित्या मद्याची वाहतूक करताना सावंतवाडी येथील एकाला ताब्यात घेण्यात आले आहे.ही कारवाई आज पहाटेच्या सुमारास करण्यात आले असून त्याच्याकडून तब्बल 4,03,440 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे.

दरम्यान या प्रकरणी महेश दाभोलकर रा. सावंतवाडी असे ताब्यात घेणाऱ्या संशयत आरोपीचे नाव आहे. ही कारवाई इन्सुली राज्य उत्पादन शुल्क पथकाकडून करण्यात आली आहे.

You cannot copy content of this page