⚡वैभववाडी ता.०९-: वैभववाडी तालुका भाजपा अल्पसंख्याक सेल अध्यक्ष पदी रज्जाक लांजेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्तीचे पत्र आमदार नितेश राणे यांनी श्री लांजेकर यांना सुपुर्द केले आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार नितेश राणे यांच्या आदेशानुसार ही नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे.
आठ दिवसांपूर्वी रज्जाक लांजेकर यांनी उबाठा सेनेतून भाजपा मध्ये प्रवेश केला होता. आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश पार पडला होता. आ. राणे यांनी लांजेकर यांच्या वर अल्पसंख्याक सेल ची जबाबदारी देत त्यांना संधी दिली आहे.
नियुक्ती पत्र देते वेळी माजी सभापती भालचंद्र साठे, भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष हुसेन लांजेकर, जिल्हा पदाधिकारी राजेंद्र राणे, हमीद लांजेकर, मजीद नंदकर, मजीद चोचे, तय्यब लांजेकर, समीर चोचे , अमीन लांजेकर, अलदिन लांजेकर, रफीक नाचरे व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
वैभववाडी भाजपा अल्पसंख्याक सेल अध्यक्ष पदी रज्जाक लांजेकर यांची नियुक्ती…
