आमदार नितेश राणे यांनी देखील सहभाग घेतला: ग्रामस्थांची मोठी उपस्थिती..
⚡वैभववाडी ता.०९-: भुईबावडा येथे गांगेश्वर मंदिरात महाशिवरात्री उत्सवानिमित्त सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात मोठ्या संख्येने वारकऱ्यांनी हजेरी लावली. आमदार नितेश राणे यांनी देखील यानिमित्त उपस्थित राहून किर्तनात सहभाग घेतला. गळ्यात टाळ घालत वारकरी म्हणून आ. राणे हे सहभागी झाले होते. यावेळी हभप अनंत महाराज मोरे यांनी यावेळी किर्तनातून सेवा बजावली.
यावेळी माजी सभापती भालचंद्र साठे, सरपंच बाजीराव मोरे, तानाजी मोरे, संतोष मोरे, संदीप मोरे, दिपक पांचाळ, अकोबा मोरे, मनोहर मोरे व भुईबावडा ग्रामस्थ व वारकरी उपस्थित होते.
