आचरा पारवाडी येथील जेष्ठ नागरिक मनोहर साटम यांचे निधन…

⚡मालवण ता.०८-: मालवण तालुक्यातील आचरा पारवाडी येथील जेष्ठ नागरिक मनोहर तुकाराम साटम, यांचे आज सकाळी त्यांच्या राहात्या घरी हृदयविकाराच्या तीव्र धक्याने निधन झाले. ते 85 वर्षाचे होते, आचरे पारवाडी येथील अनेक भजनात धरकरी म्हणून त्यांनी सेवा केली होती. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, दोन मुली, पत्नी, सुना, जावई, नांतवडे असा परिवार आहे. आचरे येथील साटम लंच होमचे मालक विकास साटम आणि रामेश्वरा सार्वजनिक वाचनमंदिर सांस्कृतिक मंडळाचे सदस्य रुपेश साटम यांचे ते वडील होत. त्यांच्या निधनाने आचरे पारवाडी सांस्कृतिक सेवा मंडळ यांनी दुःख व्यक्त केले आहे.

You cannot copy content of this page