श्री देव बांदेश्वर मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन…

⚡बांदा ता.०४-: बांदा येथील जागृत असलेल्या व भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री देव बांदेश्वर मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
गुरुवार दिनांक ७ रोजी रात्री ९ ते १२ वाजेपर्यंत श्रींची मंदिराभोवती सवाद्य पालखी प्रदक्षिणा होणार आहे. शुक्रवार दिनांक ८ रोजी सकाळी सूर्योदयापासून दुसऱ्या दिवशी सूर्योदयापर्यंत अष्टप्रहार रुद्रावर्तन व अभिषेक सोहळा, सकाळी ८ ते दुपारी ३ पर्यंत शिवलिलामृत ग्रंथ पारायण, सायंकाळी ३.३० ते ८.३० पर्यंत विविध भजनी मंडळाची भजने, रात्री ९ ते १२ वाजेपर्यंत श्रींची मंदिराभोवती सवाद्य पालखी प्रदक्षिणा होणार आहे.
शनिवार दिनांक ९ रोजी सायंकाळी ५ ते ९ श्री देव बांदेश्वर मंदिर ते श्री देव पाटेश्वर मंदिर पर्यंत सवाद्य पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे. रात्रौ ९ वाजता नितीन आसयेकर प्रस्तुत श्री देवी भूमिका दशावतार लोककला नाट्यमंडळ, मळगाव यांचा श्री संत सद्गुरू देवावतारी “बाळुमामा” हा ट्रिकसिनयुक्त दणदणीत नाट्यप्रयोग सादर होणार आहे. येथील धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन श्री देव बांदेश्वर स्थानिक सल्लागार उपसमिती व बांदा ग्रामस्थ यांनी केले आहे.

You cannot copy content of this page