आरोस शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षपदी नीलेश उर्फ बाळा परब यांची फेरनिवड…

⚡सावंतवाडी ता.०२-: आरोस शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षपदी नीलेश उर्फ बाळा परब यांची फेरनिवड झाली. नुकत्याच झालेल्या शिक्षण संस्थेच्या वार्षिक सभेत ही बिनविरोध निवड प्रक्रिया झाली. इतर सर्व पदाधिकारी व संचालक निवड प्रक्रियाही बिनविरोध झाली.

उपाध्यक्षपदी महादेव पांगम, सचिव पदी शांताराम गावडे, सहसचिव पदी सिद्धेश नाईक, खजिनदारपदी नारायण मोरजकर तर संचालक म्हणून गजानन परब, आनंद नार्वेकर, प्रमिला नाईक, हेमंत कामत, शांताराम आरोलकर, सद्गुरू सावळ यांची निवड करण्यात आली. यावेळी माजी अध्यक्ष भाऊ कामत,आरोस सरपंच शंकर नाईक, श्रीधर नाईक, आनंद परब, तुळशीदास मालवणकर आदी उपस्थित होते. सर्वांना सोबत घेऊन शैक्षणीक विकासासाठी कार्यरत राहू, अशी ग्वाही यावेळी परब यांनी दिली. वार्षिक सभा खेळीमेळीच्या वातावरणात झाली.

You cannot copy content of this page