मनसेच्या मागणीलाअखेर यश..
⚡सावंतवाडी ता.२७-: न्हावेली गावात जीर्ण स्वरूपात असलेले विद्युत पोल बदलुन महावितरणने बदलून देत विद्युतवाहीनी सुरळीत करून दिली. मनसेचे न्हावेली ग्रामपंचायत सदस्य आणि मनसे विभाग अध्यक्ष अक्षय पार्सेकर आणि न्हावेली ग्रामपंचायत सदस्य आरती माळकर यांच्या मागणीला अखेर यश आले.
न्हावेली गावात असलेले विद्युत पोल बरीच वर्ष जिर्ण स्वरूपात होते. हे विद्युत पोल बघुन न्हावेली ग्रामस्थांनी मनसे ग्रामपंचायत सदस्य आणि विभाग अध्यक्ष अक्षय पार्सेकर यांच्या निदर्शनात आणून दिले. पार्सेकर यांनी लगेच स्थानिक ग्रामस्थांना घेऊन सावंतवाडी विद्युत महावितरण शाखेत भेट देत निवेदन दिले होते. या निवेदनाचा पाठपुरावा करून घेत महावितरणने जिर्ण पोल बदलुन दिले. त्यामुळे न्हावेलेतील ग्रामस्थानी अक्षय पार्सेकर आणि मनसे कार्यकर्त्याचे आभार मानले. पोल बदलतेवेळी न्हावेली ग्रामपंचायत सदस्य तथा मनसे विभाग अध्यक्ष अक्षय पार्सेकर, न्हावेली ग्राम पंचायत सदस्य आरती मालकर, चेतन पार्सेकर, प्रथमेश नाईक, राज धवण, नवनाथ पार्सेकर, किशोर पार्सेकर, अमोल पार्सेकर, दीपक बरकुटे, भावेश पार्सेकर, प्रसाद आरोंदेकर, दिपक पार्सेकर, तुकाराम पार्सेकर, मयंग पार्सेकर, धनेश नाईक, दत्तप्रसाद पार्सेकर, अजय पार्सेकर, भूषण पार्सेकर, वासुदेव पार्सेकर, सुदन पार्सेकर, उदय परब, रूपेश पार्सेकर, राकेश न्हावेलकर, सावळाराम न्हावेलकर, सौरभ पार्सेकर, कुणाल पार्सेकर आदी मनसे कार्यकर्ते उपस्थित होते.
