पाळणेकोंड येथील नळयोजनेचे पाईप चोरीला…

दोन महिन्यापूर्वीची घटना ; पोलिसात तक्रार देऊनही तपास शुन्य;बबन साळगावकर

⚡सावंतवाडी ता.२३-: नगरपरिषदेच्या पाळणेकोंड धरण येथील पाईपलाईनचे काम सुरू आहे. येथील सुमारे साडेपाच लाख रुपयांचे पाईप चोरीस गेले असून तपास काम शून्य आहे. सुमारे दोन महिन्यापूर्वी संबंधित ठेकेदाराने सावंतवाडी पोलीस स्टेशनवरती याची नोंद केली.

34 पाईप 200 किलो वजनाचे आहे. याची किंमत सुमारे साडेपाच लाख रुपयांच्या घरात जाते. याबाबत एफ आय आर दाखल करू नही पोलीस तपास योग्य दिशेने होत नाही. सावंतवाडीचे नूतन पोलीस निरीक्षक श्री. धुमाळ यांनी तपास कामाला गती द्यावी व चोरांपर्यंत पोहचावे असं आवाहन माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केल आहे.

You cannot copy content of this page