कणकवली येथे संत शिरोमणी संत रोहिदास महाराज यांची जयंती साजरी…

⚡कणकवली ता.२४-: सिंधुदूर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ सिंधुदुर्ग शाखा कणकवलीच्यावतीने संत शिरोमणी संत रोहिदास महाराज यांची जयंती तालुकाध्यक्ष महानंद चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली साजरी करण्यात आली.

संत रोहिदास महाराज ६४७ वी जयंती कणकवली येथे चंदू भोसले यांच्या घरी तालुकाध्यक्ष महानंद चव्हाण यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व रोहिदासांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून साजरी करण्यात आली. यावेळी चंदू जिल्हा अध्यक्ष सुजित जाधव, लवेंद्रं किंजवडेकर, जिल्हा कोषाध्यक्ष नामदेव जाधव, तालुका सचिव अविनाश चव्हाण, सहसचिव सुंदर जाधव, भोसले, शरद जाधव, जिल्हा उपाध्यक्ष राजन चव्हाण, जिल्हा सदस्य आनंद जाधव, उपाध्यक्ष सत्यविजय जाधव, सदस्य अनिल चव्हाण मार्गदर्शक डॉ. केशव पावसकर डॉ. अशोक नारकर, सिताराम पवार, ज्येष्ठ मार्गदर्शक अंकुश पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी शरद जाधव यांनी मार्गदर्शन केले तसेच अध्यक्ष महानंद चव्हाण यांनी संत रविदासांचे विचार आणि त्यांचे चरित्र कथन केले. ‘प्रत्येकाने संत रविदास यांचे चरित्र वाचा व विचार आत्मसात करा’ असे प्रतिपादन केले. शेवटी सचिव अविनाश चव्हाण यांनी आभार मानून कार्यक्रम संपल्याचे जाहीर केले.

You cannot copy content of this page