⚡बांदा ता.२३-: नट वाचनालय, बांदा या संस्थेकडून दिला जाणारा (कै.) प्र. श्री. नेरूरकर साहित्य पुरस्कार यावर्षी केरी-पेडणे गोवा येथील न्यू इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक भावार्थ रघुनाथ मांद्रेकर यांना नेरुरकर यांच्या जन्मदिन कार्यक्रमात प्रदान करण्यात आला.
वाचनालयाच्या नाडकर्णी मभागृहात झालेल्या या कार्यक्रमात व्यासपीठावर वाचनालयाचे अध्यक्ष एस. आर. सावंत, सत्कारमूर्ती प्रा. भावार्थ मांद्रेकर, वाचनालयाचे सचिव राकेश केसरकर, उपाध्यक्ष निलेश मोरजकर, सदस्य सुधीर साटेलकर, ज्येष्ठ मार्गदर्शक अंकुश माजगावकर, संतोष वालावलकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री केसरकर यांनी केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांप्रती कृतज्ञता म्हणून श्रध्दांजली वाहण्यात आली. व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाल्यावर (कै.) प्र. श्री. नेरूरकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालण्यात आला. सर्व उपस्थित मान्यवरांचे स्वागत गुलाबपुष्प देऊन करण्यात आले. त्यानंतर कै. नेरुरकर यांच्याविषयी अन्वर खान, अनंत भाटे यांनी मनोगत व्यक्त केले. सदस्य प्रकाश पाणदरे यांनी नट वाचनालयाच्या वाटचालीची पार्श्वभूमी सांगितली. संतोष वालावलकर यांनी कै. प्र. श्री. नेरुरकर यांच्यासंबंधीच्या आठवणी सांगितल्या. श्री केसरकर यांनी प्रा. मांद्रेकर यांना द्यावयाच्या मानपत्राचे वाचन केले. त्यानंतर प्रा. भावार्थ मांद्रेकर यांचा वाचनालयाचे अध्यक्ष श्री सावंत यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
सत्काराला उत्तर देताना प्रा. मांद्रेकर यांनी वाचनालयाप्रती कृतज्ञता व्यक्त केली. त्यांनी ‘अद्वितीय रणसंग्राम’ व ‘खंबीर सरनौबत हंबीरराव” या आपल्या साहित्या- संबंधी इतिहास कथन केला.
यावेळी वाचनालयाचे उपाध्यक्ष निलेश मोरजकर, सहसेक्रेटरी हेमंत मोर्ये, सदस्य शंकर नार्वेकर, जगन्नाथ सातोसकर, महिला सदस्या सौ. स्वप्निता सावंत, गुरुनाथ नार्वेकर, महादेव वसकर, अमोल आयोलकर, अथर्व मांद्रेकर, सुभाष नाईक, संकेत वेंगुर्लेकर, सौ. श्वेता कोरगावकर, रेश्मा सावंत, प्राची नार्वेकर, दिशा सावंत तसेच वाचक व वाचनालयाच कर्मचारी उपस्थित होत.
