⚡सावंतवाडी ता.२३-: मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना सावंतवाडीच्यावतीने तालुकास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
ही निबंध स्पर्धा ५ वी ते ८ वी आणि ९ वी ते ११ वी या गटात होणार आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांचे निबंध प्रशालेने नाव लिहून घेऊन जमा करावेत.
दिनांक २८/०२/२०२४ पर्यंत हे निबंध प्रशालेने आपल्याकडे जमा करावेत. दिनांक २९/०२/२०२४ ते ०१/०३/२०२४ या कालावधीत प्रशालेतून महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे गोळा करण्यात येतील. निबंध लिहिण्यासाठी अ४ साइज पांढरा कागदाचा वापर करावा, त्याच कागदावर सर्वात शेवटी स्वतः चे पूर्ण नाव, शाळेचे पूर्ण नाव, इयत्ता, मोबाईल नंबर व पूर्ण पत्ता लिहिणे आवश्यक आहे, निबंध स्वतःच्या हस्ताक्षरात असावाम, निबंध निळ्या पेन ने लिहिणे आवश्यक आहे, aनिबंध मराठी भाषेतच लिहिलेला असावा, दोन्ही गटांसाठी शब्द मर्यादा ५००-६०० शब्द आहे, विद्यार्थ्यांनी निबंध २८ फेब्रुवारी रोजी चार वाजेपर्यंत शाळेत जमा करावेत, बक्षिस वितरणाची तारीख व वेळ नंतर कळविण्यात येईल.५ वी ते ८ वी-१. माझा आवडता कवी कुसुमाग्रज, २. मराठी भाषा दिन, ३. माझी मातृभाषा मराठी, ९ वी ते ११ वी-१. माय मराठी २. मराठी भाषा संवर्धन काळाची गरज, ३. मातृभाषेतून शिक्षण काळाची गरज, ४. मातृभाषेचे महत्व असे विषय आहेत. स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना चषक व प्रशस्तिपत्रक देऊन गौरवण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी साहिल तळकटकर ७५८८४८३७६३, अमोल नाईक ७५०७७५७०६७ यांच्याशी संपर्क करावा. तालुक्यातील जास्तीत जास्त प्रशालेतून विद्यार्थ्यांनी निबंध स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष केतन सावंत यांनी केले आहे.
