धर्मवीर ग्रुपच्या सार्वजनिक शिवजयंती उत्सवाला राजेंद्र पेडणेकर यांची भेट…

⚡कणकवली ता.२३-: माऊली मित्र मंडळ व संलग्न मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र मनोहर पेडणेकर यांची मंडळाचे पदाधिकारी व सदस्यांसोबत कणकवली तालुक्यातील नागवे येथील सांगवेकरवाडी धर्मवीर ग्रुपच्या सार्वजनिक शिवजयंती उत्सवाला उपस्थिती दर्शविली .
यावेळी धर्मवीर ग्रुपचे प्रमोद सांगवेकर, ज्ञानदेव मोडक , सईद नाईक यांनी माऊली मित्र मंडळाच्या पदाधिकारी व सदस्यांचे शाल, श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
शिवछत्रपतींच्या गनिमी काव्यांचे आचरण विश्वातील सर्व देशांनी आचरणात आणुन आपल्या देशांची प्रगती केली, आपण ही याच मार्गावर चाललो तर आपली ही प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही, असे राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी मनोगत व्यक्त केले

कणकवली तालुक्यातील नागवे येथील सांगवेकरवाडी धर्मवीर ग्रुपच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या “सार्वजनिक शिवजयंती उत्सवाला” दुसरे वर्ष असून यावेळी सकाळी १० वाजता श्री शिवछत्रपतींची पुजा,शिवचरित्र आधारित कार्यक्रम, पोवाडा कार्यक्रम,दुपारी ३ ते हळदीकुंकू ४ वाजता महिलांचे हळदीकुंकू, ५ वाजता निबंध लेखन स्पर्धा,रात्रौ ८ वाजता स्थानिकांची भजने, १० वाजता डबलबारीचा जंगी सामना अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते,

धर्मवीर ग्रुपचे प्रसाद वाळके, वासुदेव भट्ट, मुकेश मोडक, नित्यानंद चिंदरकर, विकास राऊत, सुर्यकांत राणे, संजय साटम, विनोद कुंभार, विनायक मुंज, प्रेरणा सांगवेकर, आदी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.यावेळी माऊली मित्र मंडळाचे प्रभाकर कदम ,अविनाश गावडे ,भगवान कासले, प्रसाद उगवेकर ,प्रसाद पाताडे ,बाबुराव घाडीगावकर, लक्ष्मण महाडिक आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page