शहरातील धोकादायक गतिरोधक तात्काळ काढा…

सुरेश भोगटे:सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निवेदनद्वारे मागणी…

⚡सावंतवाडी ता.२३-: शहरातील शिवाजी चौक गवळी तीठा व रेणुका हॉटेल येथील घालण्यात आलेले धोकादायक गतिरोधक तात्काळ काढा, अशी मागणी आज सार्वजनिक बांधकाम विभागाकडे माजी नगरसेवक सुरेश भोगटे यांनी निवेदनद्वारे केली आहे.

निवेदनात असे नमूद करण्यात आले की सकाळी हॉटेल रेणुका व स्टॅन्ड परिसरात व इतर ठिकाणी प्राणघातक गतिरोधक बसवण्याचे काम सुरू होते तेथील नागरिकांनी बंद केले कोणतीही गरज नसताना लोकांच्या जीवितास धोका होण्याएवढे व आसपासच्या लोकांची निंद्रानाशा करणारे ध्वानी प्रदूषण व वाहनांचे व गतिरोधकामुळे आवाज होऊन लहान मुलांच्या तसेच वृद्धांचे जीवितास ध्वनी प्रदूषणामुळे धोका व झोप नाहीशी झाली आहे. तसेच या गतिरोधकामुळे अपघाताचे प्रमाण वाढणार आहेत.त्यामुळे कोणतीही गरज नसताना बेसुमारे संख्येने घातलेले गतिरोधक तात्काळ हटवण्यात यावे व चुकीच्या नियोजनामुळे वाहनांचे व चालकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे.त्यामुळे तात्काळ दखल घेऊन ते गतिरोधक हटवण्यात यावे अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देखील श्री भोगटे यांनी यावेळी निवेदनद्वारे दिला आहे.

यावेळी सुधीर पराडकर महेश नार्वेकर स्वप्निल कामते दीपक सावंत संतोष खंदारे व इतर

You cannot copy content of this page