सार्वजनिक बांधकाम विभागाकडून शहरात जीवघेणे गतिरोधक…

सुरेश भोगटेंचा आरोप; आश्वासनाअंती रास्ता रोको आंदोलन घेतले मागे..

⚡सावंतवाडी ता.२३-: सावंतवाडी शहरातील मध्यवर्ती ठिकाणी जीव घेणे गतिरोधक सार्वजनिक बांधकामकडून घालण्यात आल्याने आज सकाळी माजी नगरसेवक सुरेश भोगटे यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. दरम्यान ठेकेदाराला जाब विचारल्यानंतर लगेच काम थांबून पुढील काम न करण्याच्या सूचनेवरून आंदोलन मागे घेण्यात आले.

याबाबत अधिक माहिती अशी की सावंतवाडी शहरांमध्ये ठीकठिकाणी जीव घेणे गतिरोधक सार्वजनिक बांधकाम विभागाकडून घालण्यात येत असून काही ठिकाणी कारण नसताना देखील हे गतिरोक असल्याने लोकांना त्रासदायक होत असून अपघात देखील होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे विनाकारण काही ठिकाणी गतिरोधी घालून मोठा प्रमाणात खर्च दाखवून मार्च अगोदर पैसे लुटण्याचा डाव असल्याचा आरोप देखील श्री भोगटे यांनी यावेळी केले. दरम्यान ज्या ठिकाणी कारण नसताना गतिरोधक घातले आहेत ते त्वरित हटवण्यात यावे अन्यथा जन आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा देखील श्री.भोगटे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिला आहे.

You cannot copy content of this page