⚡बांदा ता.२२-: बांदेश्वर फिटनेस क्लब आयोजित ‘द बीएफसी क्लासिक २०२४’ या जिल्हास्तरीय भव्य दिव्य शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन शनिवार दिनांक २४ रोजी सायंकाळी ६ वाजता खेमराज मेमोरीयल इंग्लिश स्कुलच्या भव्य पटांगणावर करण्यात आले आहे. ही स्पर्धा मेन फिजिक्स व बॉडीबिल्डींग अशा 2 प्रकारामध्ये होणार आहे.
या बाबतची माहिती देताना बीएफसीचे मालक संदेश सावंत यांनी यातील विजेत्यांना रोख रक्कम, चषक, मेडल, प्रमाणपत्र व अंतिम विजेत्याला मानाचा जरीचा पट्टा देण्यात येणार आहे असे सांगितले आहे. या स्पर्धेमध्ये मेन फिजिक्स या प्रकारामध्ये टॉप 10 स्पर्धक निवडले जातील त्याचप्रमाणे बॉडीबिल्डिंग ही स्पर्धा 55 किलो, 60 किलो, 65 किलो, 70 किलो, आणि 70 किलो वरील खुला गट अश्या एकूण 5 गटा मध्ये ही स्पर्धा होणार आहे.
जास्तीत जास्त स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन या स्पर्धेचे आयोजक संदेश सावंत यांनी केले आहे.
