सुंदरवाडी रिक्षा चालक मालक सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्ष पदी श्रीरंग म्हापसेकर…

उपाध्यक्षपदी पॅटरीक डिसोजा:सर्व सभासद व संचालक मंडळांनी केले स्वागत..

⚡सावंतवाडी ता.२२-:सुंदरवाडी रिक्षा चालक मालक सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्ष पदी श्रीरंग म्हापसेकर व उपाध्यक्षपदी पॅटरीक डिसोजा यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीमुळे सर्व सभासद व संचालक मंडळांनी स्वागत केले आहे.

पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक न घेता निवडणूक निर्णय अधिकारी श्री आरंदेकर यांच्या उपस्थितीत माळवते अध्यक्ष श्यामसुंदर नाईक यांनी नवीन अध्यक्ष श्रीरंग म्हापसेकर व उपाध्यक्ष पॅटरीक डिसोजा यांची निवड करण्यात आली आहे.

यावेळी श्री उपाध्यक्ष पॅटरीक डिसोजा यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांचे स्वागत करून सर्व संचालक व सभासदांना शुभेच्छा देऊन पतसंस्थेच्या पुढील भावी कार्यकालासाठी अनेक योजनांचे महत्त्व पटवून दिले तसेच मार्गदर्शन केले.

यावेळी संचालक श्री गजानन सावंत भाऊ पाटील रवींद्र सावंत जयवंत टंगसाळी श्यामसुंदर नाईक सर्व कर्मचारी व्यवस्थापक श्री नवनाथ परब आधी उपस्थित होते.

You cannot copy content of this page