ध्येय ठरवून एकाच विषयात प्रयत्न केल्यास यश निश्चित…

पत्रकार पाल्यांना जिल्हाधिकारी किशोर तावडे यांचे आवाहन:जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने गुणवंत पत्रकार पाल्यांचा करण्यात आला सत्कार.

ओरोस ता.२०-:

तुम्हाला काय बनायचे हे निश्चित करा. तेच धेय्य ठरवा. धेय्य बदलत राहू नका. त्यासाठी प्रचंड मेहनत घ्या. आपण आपल्या विषयात टॉपर होणार, हे ठरवा. यश निश्चित मिळेल. त्यासाठी नियोजन करून प्रामाणिक मेहनत घ्या, असे आवाहन जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी जिल्ह्यातील पत्रकारांच्या पाल्यांना केले.
सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने सिंधुदुर्ग नगर येथील आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर स्मारक व पत्रकार भवन येथे पत्रकार सभासदांच्या पाल्यांचा सत्कार कार्यक्रम आयोजित केला होता यावेळी जिल्हाधिकारी तावडे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी जिल्हाधिकारी तावडे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रम अध्यक्ष तथा जिल्हा पत्रकार संघ अध्यक्ष उमेश तोरसकर, उद्योजक विवेकानंद नाईक, मराठी पत्रकार परिषदेचे माजी अध्यक्ष गजानन नाईक, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, ज्येष्ठ पत्रकार माधव कदम, अण्णा केसरकर, संतोष वायंगणकर, गणेश जेठे, नंदकिशोर महाजन, सचिव देवयानी वरसकर, खजिनदार संतोष सावंत, बाळ खडपकर, महेश सरनाईक, प्रकाश काळे, लखू खरवत, संतोष राऊळ, हरिश्चंद्र पवार, अभिमन्यू लोंढे, महेश रावराणे, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष अमोल टेमकर यांच्यासह अन्य पत्रकार, पत्रकार कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page