विधानसभा लढविणार असल्याचे जाहीर केल्यानेच माझ्याबद्दल चुकीची बॅनरबाजी…

गैरसमज पसरविणारी टिल्लू पिल्लू पदावर आल्यास काय होईल याचा जनतेने विचार करावा:केसरकर यांचा राजन तेलींवर नाव न घेता टीका..

⚡सावंतवाडी ता.२०-: मी लोकसभा नाही तर विधानसभा लढवणार असे जाहीर केल्यानंतर ज्या विरोधात निर्माण झालेल्या अपवृतीची टिल्लू पिल्लू मतदार संघात चुकीची बॅनरबाजी करून लोकांच्या मनात गैरसमज निर्माण करत आहे. ही प्रवृत्ती उद्या पदावर आल्यास नेमकं काय करतील याचा याचा विचार जनतेने करावा असे टीका शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी माजी आमदार राजन तेली यांचे नाव न घेता केली.

श्री केसरकर यांनी आज आपल्या निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी ते बोलत होते त्यांच्यासोबत माजी उपनगराध्यक्ष तानाजी वाडकर एडवोकेट अरुण पणदूरकर बाबू कुडतरकर प्रेमानंद देसाई उपस्थित होते. ते म्हणाले सावंतवाडी मतदार संघात मोठ्या प्रमाणात विकास कामांना आलेली आणला आहे चांदा ते बांदा योजनेच्या माध्यमातून अनेक विकास कामे केली परंतु आजही चांदा ते बांधा योजनेचे पैसे पडून आहेत हे पैसेही लवकरच खर्च घातले जाईल मुळात पर्यटनासाठी या ठिकाणी आणलेले पैसे खर्च झाले नाहीत कारण पर्यटन खात्याला यापूर्वी लाभलेले अकार्यक्षम मंत्री कारणीभूत आहेत. पण तू आज काही अपप्रवृत्ती या ठिकाणी निर्माण झाली आहे या अपप्रवृत्तीची टिल्लू पिल्लू माझ्या विरोधात चुकीची बॅनरबाजी करत आहे परंतु अशा बॅनरबाजीने कुठलाही फरक पडणार नाही जनता सुज्ञ असून मतदार संघाचा विकास कोण करणार हे त्यांना आहे मात्र मी विधानसभा लढवणार लोकसभा लढवणार नाही हे जाहीर केल्यानंतरच ही अपप्रवृत्ती जागृत झाली आहे मुळात त्यांना लोकसभा लढवण्यासाठी मला प्रवृत्त करायचे आहे परंतु मी ठिकाणी विधानसभा लढवणार आहे. मुळात ही अपप्रवृत्ती आज ज्याप्रमाणे ठेकेदारांना धमकावून त्रास देत आहे ही अपप्रवृत्ती उद्या पदावर आली तर नेमकं काय होईल हे इथल्या जनतेने लक्षात घ्यावे.
सिंधुदुर्गातील माजी आमदार परशुराम उपरकर हे सत्तेतील पक्षात जाणार ते शिंदे शिवसेनेत येणार आहेत का याबाबत त्यांना विचारले असता अद्याप पर्यंत याबाबत काहीच कल्पना नाही परंतु ते सेनेत येण्यास इच्छुक असल्यास याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच घेतील. तर मनसेचे नेते राज ठाकरे हे महायुतींच्या नेत्यांना भेटले संदर्भात त्यांना विचारले असता बाळासाहेबांचा वारसा असलेली लोक महायुतीमध्ये निश्चितच येऊ शकतात राज ठाकरे महायुतीमध्ये आलास त्यांचे निश्चितच स्वागत असेल परंतु याबाबतचा सर्वस्वी निर्णय हा माहितीच्या वरिष्ठांचा असेल असे त्यांनी सांगितले.

चौकट
पंतप्रधान ग्रामसडकच्या अधिकाऱ्यांना झापले…
पंतप्रधान ग्रामसडक योजनेची कामे अद्यापही सुरू न झाल्याने यावेळी मंत्री केसरकर यांनी उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांना चांगलेच छापले तात्काळ या संदर्भात सर्व ठेकेदारांना बोलवा व बैठक घ्या ठेकेदार ऐकत नसल्यास झालेल्या त्यांच्या कामाची कॉलिटी कंट्रोल मार्फत चौकशी लावून संबंधित ठेकेदारांना ब्लॅक लिस्टमध्ये टाकून नवीन ठेकेदार नेमा. सात दिवसात निविदा न भरल्यास फेरनिविदा काढा असेही त्यांनी खडसावले.

You cannot copy content of this page