⚡वेंगुर्ले ता.१९-: वेंगुर्ले तालुका मराठा समाजाच्या वतीने आज शिवजयंती साजरी करण्यात आली .यानिमित्त शहरातून वेंगुर्ले पावर हाऊस ते माणिक चौक ते श्री देवी सातेरी मंदिर अशी मोटार सायकल बाईक रॅली काढण्यात आली.
यावेळी माणिकचौक येथे मराठा समाजाचे तालुकाध्यक्ष सिद्धेश परब यांनी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. यावेळी दाभोली हायस्कूलच्या वतीने पोवाडा सादर करण्यात आला .यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय जय, भवानी जय – शिवाजी ,हर हर महादेव ,एक मराठा – लाख मराठा आदी घोषणानी परिसर दणदणून गेला . यावेळी रवींद्र परब, एम . के. गावडे , प्रज्ञा परब ,अजित राऊळ , अस्मिता राऊळ ,हेमंत गावडे , रवी धोंड , मयुरेश परब, मितेश परब ,स्वप्निल पालकर, मंगेश परब ,सुनील नाईक, संजय परब ,रुपेश सावंत ,नामदेव सरमळकर ,जीवन परब आदींसह अन्य मराठा समाज बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.
