ठाकरे शिवसेनेतर्फे आप्पासाहेब पटवर्धन चौकात शिवजयंती साजरी…

⚡कणकवली ता.१९-: छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती कणकवली शहरासह तालुक्यात ठिकठिकाणी शिवप्रेमींनी मोठ्या उत्साहात साजरी केली. ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय, ‘जय भवानी जय शिवाजी’ अशी घोषणाबाजी शिवप्रेमींनी करत वातावरण ‘शिवमय’ केले. सकल मराठा समाज, शिवजयंती उत्सव समिती, ओबीसी समाज शहरातून बाईक रॅली काढली. शिवजयंतीनिमित्त शहरासह तालुक्यात ठिकठिकाणी विविध कार्यक्रम पार पडले. छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवरायांच्या पुतळ्याचे दर्शन घेण्यासाठी दिवसभर शिवप्रेमींची रिघ लागली होती.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे येथील आप्पासाहेब पटवर्धन चौकात शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी जिल्हाप्रमुख संदेश पारकर, महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख नीलम पालव, युवासेनेचे जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, तालुकाप्रमुख शैलेश भोगले, शहरप्रमुख प्रमोद मसुरकर, उद्योजक रामदास विखाळे, माजी जि. प. सदस्या स्वरुपा विखाळे, वैदेही गुडेकर, दिव्या साळगावकर, माजी नगरसेवक रुपेश नार्वेकर,कन्हैया पारकर, प्रसाद अंधारी, कलमठचे माजी सरपंच निसार शेख, एसटी कामगार सेनेचे तालुकाप्रमुख वैभव मालंडकर, राजू राठोड, विलास गुडेकर, रुपेश आमडोसकर, संतोष गुरव, सचिन आचरेकर, सोहम वाळके, बाबू कोरगावकर, निसार खान, सोमा गायकवाड,चेतन मुंज,संदीप कांबळी, यांच्यासह शिवसैनिक व युवासैनिक उपस्थित होते.

कणकवली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवरायांच्या पुतळ्याला आमदार नीतेश राणे, माजी आमदार परशुराम उपरकर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अबीद नाईक, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, युवासेनेचे जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, राष्ट्रवादीचे सावळाराम अणावकर, अँड. उमेश सावंत, भाजपचे तालुकाध्यक्ष संतोष कानडे यांच्यासह विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी व शिवप्रेमींनी पुष्पहार अर्पण करून मानाचा मुजरा केला.

You cannot copy content of this page