युवराज लखमराजे भोसले यांनी मळगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे दिली सदिच्छा भेट…

⚡सावंतवाडी ता.१८सहदेव राऊळ-: मळगाव येथे शिवजयंतीची जोरदार पूर्वतयारी सुरु असून या पार्श्वभूमीवर सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले यांनी मळगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सदिच्छा भेट दिली.

यावेळी भिल्लवाडी ग्रुपचे अध्यक्ष पांडुरंग राऊळ यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी भिल्लवाडी ग्रुपचे इतर सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. लखमराजे भोसले यांनी समस्त ग्रामस्थांना एकत्रित करत मळगाव येथे भव्य अशी शिवजयंती साजरी करत असल्याबाबत सर्वांचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या. यावेळी कोकणातील तरुणांससाठी रोजगाराची संधी उपलब्ध करून त्यांना गावातच रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आपले प्रयत्न आहेत, असे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.

You cannot copy content of this page