⚡सिंधुदुर्गनगरी ता.१८-: शिवजयंतीनिमित्त सिंधुदुर्ग
जिल्ह्यामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये आज सकाळी सिंधुदुर्ग मेडिकल कॉलेजच्या वतीने देखील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय म्हणजेच उपजिल्हा रुग्णालय ते ओरोस छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळ्यापर्यंत मॅरेथॉन फेरी आयोजित करण्यात आली होती.
याचे उद्घाटन कुडाळ – मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. आ. नाईक यांना व्यायामाची आवड असल्याने त्यांनी देखील या मॅरेथॉन फेरीमध्ये धावत सहभाग घेतला. त्यामुळे मेडिकल कॉलेजमधील विद्यार्थ्यांना सुद्धा प्रोत्साहन मिळाले. यावेळी बहुसंख्येने जिल्हा रुग्णालयातील मेडिकल कॉलेजमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांचे म्हणजेच भावी डॉक्टरांचा मोठ्या संख्येने सहभाग पाहायला मिळाला.
यावेळी आमदार वैभव नाईक यांनी मेडिकल कॉलेजमधील विद्यार्थ्यांना संबोधताना विचार मांडले की, छत्रपती शिवराय यांची जयंती उद्या साजरी होत आहे. छत्रपती शिवरायांना हे सुद्धा व्यायामाची आवड होती हे त्यांच्या कार्यातून दिसून येते. आजच्या पिढीने सुध्दा तंदुरुस्त राहण्यासाठी व्यायामाची आवड निर्माण केली पाहिजे. धावणे म्हणजे रनिंग हा एक व्यायाम आहे, असे आमदार वैभव नाईक म्हणाले.
ओरोस येथील मॅरेथॉन फेरीलाआमदार वैभव नाईक यांची उपस्थिती…
