वन्यप्राण्यांची शिकार केल्याप्रकरणी आंबोलीच्या जंगलात ६ संशयित युवकांना घेतले ताब्यात…

वनविभाग व सावंतवाडी पोलिसांनी संयुक्त कारवाई: पहाटेच्या सुमारास करण्यात आली कारवाई..

⚡सावंतवाडी ता.१८-: वन्यप्राण्यांची शिकार केल्याप्रकरणी आंबोलीच्या जंगलात बंदूक, सुरा आणि बॅटरी घेऊन फिरणाऱ्या ६ संशयित युवकांना वनविभाग व सावंतवाडी पोलिसांनी संयुक्त कारवाई करत ताब्यात घेतले आहे. ग्रामस्थांना शिकाराचा संशय आल्यानं त्यांनी हा प्रकार उघडकीस आणला. यातील काहीजण सावंतवाडीतील तर काही बांदा येथील आहेत. ही कारवाई रविवारी पहाटे सव्वा चारच्या सुमारास हिरण्यकेशी जंगल परिसरात करण्यात आली.

You cannot copy content of this page