सातत्यपूर्ण कामगिरीतून यशप्राप्ती होते…

निलेश पारकर:सहदेव जाधव यांचा नाथ पै ज्ञान प्रबोधिनी येथे सत्कार..

⚡कणकवली ता.१७-: ५१ व्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन, सावंतवाडी येथे पार पडलेल्या विज्ञान प्रतिकृती स्पर्धेमध्ये नाथ पै ज्ञान प्रबोधिनी, करुळ, ता. कणकवली या प्रशालेचे सहदेव जाधव (प्रयोगशाळा परिचर) यांच्या प्रयोगशाळा माझ्या हातात या विज्ञान प्रतिकृतीला राज्यस्तरावर द्वितीय क्रमांक मिळालेबद्दल त्यांचा करुळ हायस्कूलमध्ये त्यांचा सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करुळ हायस्कूलचे मुख्याध्यापक लक्ष्मण नारकर यांनी केले. त्यानंतर सहदेव जाधव यांचा सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षकेतर कर्मचारी संघटना जिल्हा संघटक निलेश पारकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन, सत्कार करण्यात आला. सहदेव जाधव हे आमच्या संघटनेचे सच्चा कार्यकर्ता असून, गेली अनेक वर्षे ते तालुका, जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर विज्ञान प्रतिकृतीचे सादरीकरण करीत आहे. त्यांच्या या सातत्यपूर्ण कामगिरीतूनच त्यांना ही यशप्राप्ती झालेली आहे. त्यांच्या या उत्तुंग यशामुळे प्रशाला, कणकवली तालुका व जिल्हयाचे नांव राज्यस्तरावर अधोरेखित झाले आहे, मला माझ्या या सच्च्या कार्यकत्याचा सार्थ अभिमान वाटतो, अशा शब्दात निलेश पारकर यांनी गौरवोद्‌गार काढले. याप्रसंगी प्रशालेचे सर्व शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सहदेव जाधव यांनी आपला सत्कार केलेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.श्री. कदम यांनी सर्वाचे आभार मानले. सहदेव जाधव यांच्या या सुयशाबद्दल अनिल राणे (जिल्हाध्यक्ष, शिक्षकेतर संघटना, सिंधुदुर्ग) गजानन नानचे (जिल्हा सचिव तथा विभागिय कार्यवाह, कोल्हापूर) जिल्हा पदाधिकारी तसेच अनिल माने (राज्याध्यक्ष, महाराष्ट्र) शिवाजी खांडेकर (राज्य सरकार्यवाह, महाराष्ट्र) व राज्य पदाधिका-यांनी अभिनंदन केले आहे.

You cannot copy content of this page