श्री गणेश कृपा कला क्रीडा मंडळ कसवणच्यावतीने मंदिराचा वर्धापनदिन साजरा…

⚡कणकवली ता.१७-: श्री गणेश कृपा कला क्रीडा मंडळ कसवण गावकरवाडीच्यावतीने श्री गणेश मंदिराचा 7वा वर्धापनदिन व गणेश जयंती सोहळा भक्तीमय वातावरणात पार पडला. दोन दिवसात धार्मिक व सास्कृतीक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
सकाळच्या सत्रामध्ये धार्मिक विधी, दुपारी महाआरती नंतर महाप्रसाद व 4 ते रात्रौ 11 वाजेपर्यंत विविध कार्यक्रमांची रेलचेल चालू होती. महिलांसाठी हळदीकुंकु, मुलांसाठी जल्लोष युवाईचा हा व्हरायटी शो,भजने, दशावतारीनाटक असे विविध कार्यक्रम आयोजित केले होते. महिलांसाठी ‘होम मिनिस्टर ‘ श्री गणेश मानाची पैठणी या कार्यक्रमाने रंगत आणली. हा कार्यक्रम सुनिल काणेकर (वागदे) व प्रशांत म्हापसेकार (कणकवली) यांच्या सौजन्याने आयोजित केला होता. या स्पर्धेत प्रथम क्रमांक श्रीगणेश मानाची पैठणी सौ. सपना सचिन गावकर, द्वितीय श्रीगणेश मानाची पैठणी सौ. तन्वी महेंद्र गावकर व तृतीय क्रमांक श्रीगणेश मानाची पैठणी सौ. सुनिता सुरेश गुरव. तसेच उपस्थित सर्व महिलां मधून लकी ड्रॉ पद्धतीने दोन मानाच्या पैठणी मिळल्या. त्यामध्ये नशीबवान होम मिनिस्टर ठरल्या सौ. आरुशी अरविंद पालव व सौ. प्रिया समीर गावकर या सर्वाना सौ. एकता एकनाथ गावकर, सौ.सुचिता भिकाजी गावकर, सौ. विज्ञानी वायंगनकर,सौ.स्नेहा संतोष गावकर, सौ. प्रिया मनोहर मालंडकर या महिला मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. होम मिनिस्टर कार्यक्रमात 51 महिलांनी भाग घेतला होता.यावेळी या मंडळचे अध्यक्ष विलास गावकर,संतोष गावकर, मनोहर मालंडकर, सत्यवान गुरव,अनंत पालव, भाई गावकर ,भाऊ गावकर , एकनाथ गावकर, वसंत वालावलकर, बाबी वायंगणकर , सुनिल काणेकर, प्रशांत म्हापसेकर , महेश वायंगणकर व सन्माननीय सदस्य व सर्व महिला उपस्थित होत्या. होम मिनिस्टर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलास गोलतकर यांनी केले.

You cannot copy content of this page