अर्चना घारे यांचे सौजन्य: शहरातील महिलांनी उपस्थित राहण्याचे केले आवाहन..
सावंतवाडी ता.१६-:
सावंतवाडी शरद पवार गटाच्या वतीने आज सायंकाळी पाच ते रात्री आठ वाजेपर्यंत येथील मीना ग्रुप हायस्कूल जवळील अर्चना घारे परम यांच्या संपर्क कार्यालयात हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
हा कार्यक्रम राष्ट्रवादी सावंतवाडी विधानसभा अध्यक्ष सौ अर्चना घारे परब यांच्या सौजन्याने आयोजित केला असून यावेळी शहरातील सर्व महिलांनी या हळदीकुंकूचा लाभ घ्यावा असे आवाहन ही यावेळी सौ परब यांनी केले आहे.
