प्रवीण भोसले यांचा सर्व पक्षियांच्या उपस्थितीत ७५ वा वाढदिवस होणार साजरा…

१९ फेब्रुवारी रोजी प्रवीण भाई मित्रमंडळाने केले आहे आयोजन..

⚡सावंतवाडी ता.१६-: राष्ट्रवादीचे माजी मंत्री प्रवीण भाई भोसले यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त प्रवीण भाई मित्र मंडळाच्या वतीने सर्वपक्षीयांच्या उपस्थितीत 19 फेब्रुवारीला सायंकाळी पाच वाजता आर पी डी येथील हॉलमध्ये वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती प्रवीणभाई मित्र मंडळाच्या वतीने आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली.

दरम्यान, हा वाढदिवस कोणताही राजकीय नसून हे सर्वपक्षीय समावित असल्याने सर्व पक्षातील पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी या वाढदिवसाला उपस्थित राहून श्री भोसले यांना शुभाशीर्वाद द्यावे असे आवाहन देखील प्रविण भाई मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. दरम्यान 19 रोजी प्रवीण भोसले हे आपल्या शिरोडा येथील मूळ घरी असल्याने त्यांना शुभेच्छा देण्यासाठी सर्व नागरिकांनी सायंकाळी पाच वाजता आरपीडी हायस्कूल येथेच उपस्थित राहायचं आहे असे यावेळी मित्र मंडळाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

You cannot copy content of this page