ऑर्केस्ट्रा स्टारनं जिंकली रसिकांची मने…

⚡देवगड ता.१५-: पडेल कँन्टींग येथील व्यापारी रिक्षा- रिक्षा टेम्पो वर्धापन दिनानिमित्त आयोजित ऑकेष्ट्रा स्टार कोल्हापूर गीतांच्या गायन कार्यक्रमांमध्ये तानाजी कोराने यांनी अनेक गीते गायन करुन रसिक श्रोत्यांची मने जिंकली
पडेल कँन्टींग येथे व्यापारी रिक्षा- रिक्षा टेम्पो वर्धापन दिनानिमित्त सत्यनारायणाची महापूजा व विविध धार्मिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी ऑकेष्ट्रा स्टार कोल्हापुर या गीत गायनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. या कार्यक्रमामध्ये तानाजी कोराने यांनी अनेक गीते गायन करुन रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
पडेल कँन्टींग व्यापारी व्यापारी रिक्षा- रिक्षा टेम्पो संघटनेच्या वतीने अनेक सामाजिक व शैक्षणिक कार्यक्रम राबविले जाता या संघटनेच्यावतीने अनेकवेळा रक्तदान शिबिरे देखील आयोजित करण्यात आली होती. तसेच या संघटनेच्या माध्यमातून रुग्णवाहिका देखील काहि वर्षापुर्वी घेण्यात आली आहे. पडेल दशक्रोशीमध्ये रुग्णवाहिकेची कमतरता होती हि समस्या जाणून या संघटनेच्या माध्यमातून रुग्णांना सेवा दयावी या धोरणेतून रुग्णवाहिका रुग्णांच्या सेवेसाठी उपलब्ध केली. गेली अनेक वर्षे हि संघटना समाजहिताच्या दृष्टीकोनातून काम करीत असून अनेक गोरगरीब जनतेला देखील त्यांनी वेळोवेळी अर्थसहाय्य केले आहे.
फोटो- तानाजी कोराने फोटो

You cannot copy content of this page