शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अण्णा केसरकर यांची माहिती: शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची यशस्वी शिष्ठाई
⚡सावंतवाडी ता.१५-: कृषी व विमा कंपन्यांच्या चुकीच्या कारभारामुळे काजू पीक विम्यापासून वंचित राहिलेल्या माडखोल मंडळातील नऊ गावांना नुकसान भरपाई देण्याचे आदेश कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी कृषी अधिकारी तसेच विमा कंपनीला दिले आहेत या संदर्भात मंत्रालयात शेतकरी व कामगार संघटनेची बैठक कृषिमंत्री श्री मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी यशस्वी शिष्टाई केल्याचे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष वसंत उर्फ अण्णा केसरकर सांगितले.
श्री केसरकर यांनी यासंदर्भात आज येथे पत्रकार परिषद घेतली यावेळी त्यांच्यासोबत माडखोल माजी सरपंच संजय राऊळ,ओवळीये माजी सरपंच विनायक सावंत आदी उपस्थित होते.
