अवैध गुरांची वाहतूक केल्या प्रकरणी कुडाळ येथील दोघांना घेतले ताब्यात…

आंबोली पोलिसांची कारवाई: सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

⚡सावंतवाडी ता.१४-: विनापरवाना बलेरो पिकप गाडी मधून अवैद्य गुरांची वाहतूक करताना आंबोली येथे दोघांना आज सकाळी पावणे सातच्या सुमारास ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई आंबोली पोलिसांकडून करण्यात आली आहे. संभाजी तेली रा. (कुडाळ) व अन्वर खुल्ली( रा.कुडाळ) अशी दोघांची नाव असून याप्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

You cannot copy content of this page