कणकवलीत आस्थापनाविरोधात जोरदार मोहीम..
⚡कणकवली ता.१४-: कणकवली परिसरातील ज्या दुकानदाराने इंग्रजीमध्ये दुकानाचे नाम फलक लावले आहेत त्यांनी सदरचे नामफलक 24 तासाच्या आत मराठीत लावावे अन्यथा कारवाईला आणि नुकसानीला सामोरे जावे लागेल अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
कणकवली परिसरात आस्थापनांवरील इंग्रजीतील नामफलक मराठीत लावण्याबाबत रिक्षा द्वारे जनजागृती करण्यात आली असून सदरचे नामफलक 24 तासाच्या आत न बदलल्यास कारवाई करण्यात येईल व होणाऱ्या नुकसानीला संबंधित आस्थापनाधारक जबाबदार असेल असे बजावण्यात आले आहे
