वेंगुल्यात विवाहित महिलेची आत्महत्या…

⚡वेंगुर्ले ता १०-: वेंगुर्ले तालुक्यातील उभादांडा – वाघेश्वरवाडी येथील विवाहित महिलेचा मृतदेह आज शनिवारी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास राहत्या घराच्या गच्चीवर पिवळ्या नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन मयत स्थितीत आढळून आला. याप्रकरणी वेंगुर्ले पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

वाघेश्वरवाडी येथील मंदार चौकेकर यांनी पोलिसांना माहिती देताना सांगितले की, दीक्षा लक्ष्मीकांत चौकेकर वय ५२ वर्षे या आज सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास राहत्या घराच्या गच्चीवर पिवळ्या नायलॉनच्या दोरीने गळफास लावल्यास स्थितीत दिसून आल्या. म्हणून आपण गावातील डॉक्टर मणचेकर यांना घेवुन येवून तिची तपासणी केली. मात्र डॉकटर यांनी ती मयत झाल्याचे सांगितले. याबाबत त्यांनी माहिती दिली. त्यानुसार पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली असून अधिक तपास पी एस आय. एस.एम. दाभोलकर वेंगुर्ला पोलीस ठाणे हे करीत आहेत.

You cannot copy content of this page