स्थानिक युवक व बांदा पोलिसांनी वाचविले प्राण:बांदा गवळीटेम्ब येथील घटना..
⚡बांदा ता.१०-: बांदा गवळीटेम्ब येथील शेतविहिरीत पडलेल्या इचलकरंजी येथील शुभम रमेश भोसले याला स्थानिक युवक व बांदा पोलिसांनी वेळीच बाहेर काढल्याने त्याचा जीव वाचला. त्याच्यावर बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरु आहेत. ही घटना मध्यरात्री १२ वाजण्याच्या सुमारास घडली.
