प्रभाकर सावंत: केंद्र सरकारच्या योजनेचा लाभ घेण्यापासून वंचित राहिलेल्यांच्या देखील समस्या दूर करणार..
सावंतवाडी ता.०८-:* मोदी सरकारच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठीच गाव चलो अभियान हा उपक्रम सुरू केला आहे. जेणेकरून सर्वसामान्य लोकांना योजनेचा लाभ मिळतो की नाही, त्या समस्या जाणून घेण्यासाठीच आम्ही हा उपक्रम सुरू केला असल्याची माहिती भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी आज सावंतवाडी येथे दिली.
दरम्यान, आम्ही लोकांपर्यंत जाण्यात कमी पडलो हे सत्य आहे. त्यासाठीच आम्ही आता लोकांपर्यंत मोदींच्या योजना पोहोचवण्यासाठीच हा उपक्रम सुरू केला आहे असे ही सावंत यावेळी बोलताना म्हणाले. ते सावंतवाडीत गाव चलो अभियान कार्यक्रमानिमित्त येथील बाजारपेठेत भाजी विक्रेत्यांना मोदी सरकारच्या योजनेच्या पेम्प्लेटचे वितरण करण्यासाठी आले होते.
यावेळी सावंत पुढे बोलताना म्हणाले की, गाव चलो अभियान हे प्रत्येक गावात जाऊन लोकांची संवाद साधून लोकांना योजनेबाबत लाभ मिळतो की नाही याची खातरजमा करून त्यांच्या समस्या दूर करायचा यासाठीच हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. सावंतवाडी तालुक्याला मोदी सरकारचा योजनेचा लाभ सर्वात जास्त झाला असून अनेक काही लोकांना तांत्रिक अडचणीमुळे त्याचा लाभ घेता आलेला नाही. ती तांत्रिक अडचण सुद्धा आम्ही येणाऱ्या काळात दूर करून त्यांना सुद्धा त्या योजनेचा लाभ करून देऊ असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी माजी आमदार राजन तेली, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रंजीत देसाई, जिल्हा बँक संचालक रवी मडगावकर, माजी नगराध्यक्ष संजू परब शहराध्यक्ष अजय गोंदावळे, तालुका उपाध्यक्ष दिलीप भालेकर, संजय शिरोडकर, माजी नगरसेवक आनंद नेवगी आदी उपस्थित होते.
