Headlines

घड्याळ तेच मात्र वेळ नवी…

काका कुडाळकर:अजितदादांकडे नेतृत्व आल्याने आमची खंत पूर्ण झाली..

⚡कुडाळ ता.०८-: निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष आणि चिन्ह हे अजितदादा पवार गटाकडे दिल्यानंतर सिंधुदुर्गातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आनंदित झालेत.
राष्ट्रवादी पक्ष हा अजितदादांनी खरा तयार केला आहे. मागील अनेक वर्षे आमच्यासारख्या कार्यकर्त्यांची खंत होती की, अजितदादांनी हा पक्ष चालवावा. त्यादृष्टीने निवडणूक आयोगाने दिलेला निकाल आमच्यासाठी महत्वाचा ठरला आहे. आता सिंधुदुर्ग जिल्ह्यासह राज्यात राष्ट्रवादी पक्ष मजबूत करण्यासाठी बळ मिळेल, अशी प्रतिक्रिया सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस कार्याध्यक्ष काका कुडाळकर यांनी दिली आहे.
एका प्रभावी नेत्याकडे राष्ट्रवादी पक्षाचे नेतृत्व आले पाहिजे, अशी मागणी होत होती. आमचा पक्ष राज्यात वाढला पाहिजे अशी खंत आम्ही कार्यकर्त्यांनी अनेकदा व्यक्त केली होती. अखेर ती खंत अजितदादांकडे नेतृत्व आल्याने पूर्ण झाली आहे. राष्ट्रवादीचे घड्याळ सर्वसामान्य लोकांपर्यंत नेण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू, घड्याळ तेच मात्र वेळ नवी अशी प्रतिक्रिया जिल्हा कार्याध्यक्ष काका कुडाळकर यांनी दिली आहे. राज्यातील जनतेच्या विकासासाठी ही नवी वेळ आहे. आता पक्षाला अपेक्षित असे काम जिल्ह्यात होईल, असेही काका कुडाळकर म्हणालेत.

आमच्या पक्षात गट नाहीत.
राष्ट्रवादीमध्ये गट नाहीत. अजित पवार यांनी आपल्याकडे पक्षाची जबाबदारी द्या, असे सांगितले होते. पक्षातील कार्यकर्त्यांना सुद्धा अजितदादांनी नेतृत्व करावे, असे वाटत होते.

महायुती म्हणून लढणार
येत्या काळात लोकसभा निवडणुका असून यात आम्ही, भाजप आणि शिवसेना महायुती म्हणून एकत्र लढू, असे काका कुडाळकर म्हणाले. तर ६ पेक्षा जास्त खासदार राष्ट्रवादीचे हवेत, हे आमचे स्वप्न आहे, असेही ते म्हणाले.

You cannot copy content of this page