चौकुळ मधील मुख्यमंत्री सडक मधून मळववाडी ते मराठीवाडी काम निकृष्ट…

स्वप्निल भिसे यांचा आरोप: पुन्हा रस्त्याचा दर्जेदार काम करून ठेकेदारावर कारवाई करावी…

⚡आंबोली, ता.०२-: चौकुळ मळववाडी ते मराठीवाडी बेरडकी येथील मुख्यमंत्री सडक योजनेतून अत्यंत निकृष्ट दर्जाचा रस्ता करण्यात आला आहे.प्रकारची तात्काळ चौकशी व्हावी रस्त्याचे पुन्हा दर्जेदार काम करावे आणि ठेकेदारावर कारवाई करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील भिसे यांनी केली आहे.

चौकुळ येथील मुख्यमंत्री सडक योजनेतून रस्त्याचे काम सुरू आहे मात्र ते काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे आहे.ठिकठिकाणी रस्ता उखडला आहे. मुख्यमंत्री सडक योजनेच्या रस्त्यासाठी जास्त निधी असून ही सुमार दर्जाहीन काम केले जात असल्याबाबत वाहनधारकांमधून संताप व्यक्त होत आहे.सध्या या रस्त्याचे काम निकृष्ट असून अधिकाऱ्यांनी याची पाहणी करावी आणि पुन्हा रस्ता करावा ठेकेदारावर कारवाई करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील भिसे यांनी केली आहे.

You cannot copy content of this page