आम्ही धमक्यांना आम्ही घाबरत नाही: सकल हिंदू समाजाच्या वतीने प्रसिद्धी पत्रकद्वारे भूमिका केली स्पष्ट…
⚡सावंतवाडी ता.२८-: सुसंस्कृत शहरात जो उत्स्फूर्तपणे सर्व धर्मीयांचा मोर्चा निघाला तो शांततेतच पार पडला या मोर्चावरून जर कोणाला राजकारण करून खोटे गुन्हे दाखल करायचे असतील तर त्यांनी जरूर करावे आम्ही अशा धमक्यांना घाबरत नाही असे सकल हिंदू समाजाच्या वतीने गौरेश कामत,हितेन नाईक,साई म्हापसेकर,संकल्प धारगळकर,आशिष साखळकर,पंकज तुळसुलकर,कष्णा धुळपणवार आदित्य आरेकर ,कुणाल खोत, गणेश कुडव, यांनी दिला आहे.
दरम्यान मोर्चात महाविद्यालय विद्यार्थी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते, कारण त्यांच्या मनात ती खदखद होती, ती खदखद या मोर्चाच्या रूपाने बाहेर पडली सावंतवाडी शहरातून निघालेला मोर्चा पोलीस ठाण्यात नेऊन विसर्जित करण्यात आला असे असताना मोर्चा सहभागी झालेल्या लोकांवर गुन्हे दाखल केले जातील तर ते चुकीच आहे असे मत ही त्यांनी प्रसिद्धी पत्रकद्वारे केले.
तसेच मोर्चातील लोकांवर गुन्हे दाखल करणार असे आपण बोललो नसल्याचे पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी स्पष्ट केले आहे,त्यामुळे काही लोकांच मन जपण्यासाठी अशा चुकीच्या बातम्या कोण पसरवत असतील तर त्याचा योग्य तो बंदोबस्त केला जाईल असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला आहे.
