अखेर कन्हैया पारकर, गीतेश कडूसह सह युवा सेना पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल…

जमावबंदीभंग पडला महागात

*💫कणकवली दि.१९-:* आमदार नितेश राणे यांनी वरुण सरदेसाई यांच्याविरोधात केलेल्या आरोपांविरोधात शिवसेना नगरसेवक कन्हैया पारकर, युवासेना जिल्हाप्रमुख गीतेश कडूसह अन्य पदाधिकाऱ्यांविरोधात जमावबंदी आदेशाचा भंग केल्या प्रकरणी कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 17 मार्च रोजी आमदार नितेश राणे यांच्या आरोपांचा निषेध करण्यासाठी शिवसेना कार्यालयासमोर घोषणा देत कन्हैया पारकर, गीतेश कडू यांच्यासह अन्य जणांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदी विरोधात जमाव केल्याची तक्रार कणकवली तालुका भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी कणकवली पोलीस ठाण्यात केली होती. भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, युवा मोर्चा जिल्हा संघटन सरचिटणीस संदीप मेस्त्री, नगरसेवक शिशिर परुळेकर, शहराध्यक्ष अण्णा कोदे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष नितीन पाडावे, गणेश तळगावकर, सुभाष मालंडकर सागर राणे, संदेश सावंत, राजविर पाटील यांनी लेखी निवेदनाद्वारे शिवसेना पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.त्यानुसार कन्हैया पारकर, गीतेश कडू, ललित घाडीगांवकर, निसार शेख, उमेश गुरव, प्रतीक रासम, सचिन पवार, किरण वर्दम यांच्यावर जमावबंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

You cannot copy content of this page