पाचव्या मजल्यावरुन पडून युवकाचा मृत्यु

वेंगुर्ले येथील घटना:आंबे काढताना गेला तोल

*💫वेंगुर्ले दि.१८-:* महालक्ष्मी प्लाझा या इमारतीच्या ५ व्या मजल्यावर आंबे काढण्यासाठी चढलेल्या युवकाचा तोल जाऊन खाली पडल्याने मृत्यू झाला आहे. राकेश कुमार यादव ( वय २०) असे त्या युवकाचे नाव असून उत्तर प्रदेश येथील तो मूळ राहणार आहे. ही घटना आज सायंकाळी ४:३० च्या दरम्याने घडली आहे. यावेळी त्याला संतोष निसार व त्यांच्या सहकाऱ्यांनी तात्काळ रुग्णालयात दाखल केले होते. परंतु, डॉ. परुळेकर यांनी त्याला मृत घोषित केले आहे. याबाबतची माहिती समजताच वेंगुर्ला पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून, या घटनेची पोलिस स्थानकात नोंद करण्यात आली आहे. तर या घटनेचा अधिक तपास पोलिस डी.जी.चव्हाण करत आहेत.

You cannot copy content of this page