जिल्हास्तरीय कॉम्प्युटर सायन्स हॅकेथॉन उत्सव संपन्न…

⚡कुडाळ ता.२५-: जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था व शिक्षण विभाग जि. प. सिंधुदुर्ग, अमेझॉन फ्युचर इंजिनिअर, लीडरशीप फॉर इक्विटी आणि कोड टु एनहान्स लर्निंग संस्था, यांच्या संयुक्त सहकार्याने एकदिवसीय जिल्हास्तरीय कॉम्प्युटर सायन्स हॅकेथॉन उत्सव जिल्हा पातळीवर २४ जानेवरी २०२४ रोजी कुडाळ संपन्न झाला.

जिल्ह्यातील जिल्हा परिषद, मनपा शाळामधील मधील ग्रामीण, आदिवासी आणि शहरी ७०० विद्यार्थ्यानी पहिल्या टप्प्यात नोंदणी करून सहभाग घेतला होता. त्यापैकी ३५० विद्यार्थ्यानी अनप्लग कॉम्पुटरशिवाय) चॅलेंज सोडवले होते. या विद्यार्थ्यापैकी या अनप्लग चॅलेंजमधील अचूक मांडणी आणि उत्तमपणे कामगिरी केलेल्या मुलांची या निकषाआधारे जिल्हास्तरावर ११ शाळांमधील ३३ विद्यार्थ्याची कॉम्प्युटर सायन्स हॅकेथॉन उत्सवासाठी निवड करण्यात आली.
यात निवड झालेल्या शाळेतील विद्यार्थ्यानी स्क्रॅच प्लॅटफॉर्मवर कोडींग करत त्या समस्यावर उपाय शोधून कोडींगच्या सह्यायाने गेम, अॅनिमेशन आणि अॅप्लिकेशन स्वरूपात प्रोजेक्ट तयार केले. कोडींग प्रोजेक्ट तयार करताना विद्यार्थी एकविसाव्या शतकातील कौशल्ये जसे की, चिकित्सक विचार, सहकार्य, संवाद कौशल्य, समस्या निवारण यांचा वापर केला. ही कौशल्य नवीन शैक्षणिक धोरण सुचवते की शाळांमध्ये शिकवली गेली पाहिजे, हा प्रोग्राम या धोरणाशी संलग्न ठरत आहेत. या उत्सवात त्यांना आजूबाजूच्या समस्येवर आधारित कोडींग करून प्रोजेक्ट बनवून मान्यवरांसमोर सादर केली. हे प्रोजेक्ट शेतकऱ्याचे प्रश्न, कचरा व्यवस्थापन या प्रकारच्या समस्या घेऊन तयार करण्यात आली होती.
या उत्सवामध्ये प्रथम पारितोषिक प्रगत विद्यामंदिर, रामगड तर द्वितीय पारितोषिक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुणकेश्वर आणि तृतीय पारितोषिक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आडेली क्र. १ यांनी पटकावला. एकूण सर्व ११ शाळांना ही पारितोषिके देण्यात आली. यात पहिल्या पाच शाळांना ४३ इंची एलईडी टीव्ही देण्यात आला. तर इतर ६ शाळांना टॅब व रोख बक्षिसे देण्यात आले. तर पहिला आणि दुसरा क्रमांक आलेल्या शाळेला राज्यस्तरीय हॅकेथॉन उत्सवासाठी निवड करण्यात आली.
कॉम्प्युटर सायन्स हॅकेथॉन उत्सवाला प्राचार्य आर. व्ही. कांबळे, अधिव्याखाते जाधव, पवार, पेडणेकर जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, सिंधुदुर्ग आदींची प्रमुख उपस्थित राहत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत बक्षीसे त्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. हा उत्सव इरफान ललानी, मुख्यकार्यकारी अधिकारी, कोड टु एनहान्स लर्निंग, संस्था यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला असून यामध्ये खूप उत्साहाने शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी लीडरशिप फॉर इक्विटी आणि कोड टू एन्हांस लर्निग संस्थेच्या टीमने मेहनत घेतली.

You cannot copy content of this page