राजन तेली व प्रथमेश तेली यांच्या मार्गदर्शनाखाली, राबविण्यात आले अभियान..
⚡सावंतवाडी ता.२५-: भारतीय जनता पार्टी आयोजित मतदार दिनानिमित्त नव मतदार नोंदणी अभियानाला सावंतवाडीत नवमतदारांचा उस्फुर्त प्रतिसाद लाभला.
माजी आमदार राजन तेली साहेब व युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष प्रथमेश तेली यांच्या मार्गदर्शनाखाली सावंतवाडी येथील यशवंतराव भोसले नॉलेज सिटी ऑफ फॉर्मसी महाविदयालयात हे अभियान पार पडले. दोडामार्ग, वेंगूर्ला व बांदा येथील महाविदयालयामध्ये हे अभियान राबवण्यात आले. सावंतवाडी येथील यशवंतराव भोसले नॉलेज सिटी कॉलेज ऑफ फार्मसी व सावंतवाडी येथील राजवाडा मध्ये, बांदा येथील गोगटे जोगळेकर कॉलेज पानवळ, दोडामार्ग येथील लक्ष्मीबाई सिताराम हळबे कला, वाणीज्य,विज्ञान महाविद्यालय वेंगुर्ला येथील कालेलकर सभागृह येथे हे अभियान आयोजित केले होते.
